** महानिर्मिती, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र,दीपनगर येथे सन २०२६-२०२८ करीता सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत १x६६० मे.वॅ. भुसावळ प्रकल्पाकरीता बाधीत गावातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकरीता प्रशिक्षण योजने साठीच्या मार्गदर्शक सुचना ***
instructions for Candidates:-
१) User candidate must have email account for submitting online application form. Any further official communication shall be done only on the email id of the candidate and hence candidate must remember his or her user ID and Password.
२) Read all the form carefully before finally submitting the online application form.
३) Form once submitted finally cannot be edited afterwards and no changes are allowed in the form which is finally submitted thus candidate has to take all precautions for filling of the correct online application form.
४) Maximum file size of attachment e.g. photo, mark sheet, other documents should not be more than 1 MB.
५) Candidate must upload their original scanned documents with 450 dpi resolution for clear view. The candidate himself should ensure that the uploaded documents are clearly visible. Candidates themselves will be responsible if the application is rejected due to lack of clear documents/wrong details.
६) Influencing/pressurizing the management for selection as a apprentice, directly & or indirectly through political, non-political or by any other means/ways shall disqualify the candidature of the concerned applicant.
७) Applicant must be a resident of affected village. Similarly, They must have an Aadhaar card and Domicile regarding the residence proof. Otherwise, candidate application will be invalid.
८) Applicant age should be between above 18 years and below 43 years as on 01/09/2026.
--- उमेदवारांकरिता महत्वपूर्ण सुचना :-
१. ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता उमेदवाराचा स्वतःचा ई-मेल आयडी असणे आवश्यक
आहे. भरती प्रक्रियेतील पुढील कोणताही अधिकृत संवाद फक्त उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर केला जाईल.
२. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म शेवटी काळजीपूर्वक वाचावा आणि बरोबर असल्याची खात्री करूनच SUBMIT करावा.
३. एकदा ऑनलाईन SUBMIT केलेल्या अर्जामध्ये नंतर कुठलाही बदल अथवा दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे उमेदवाराने अंतिमत: ऑनलाइन अर्ज सादर करताना योग्य ती संपूर्ण काळजी/खबरदारी घ्यावी, जेणेकरून उमेदवाराचा अर्ज अपूर्ण न राहता त्यामध्ये भरलेली संपूर्ण माहिती योग्य व अचूक राहील.
४. उमेदवारांच्या ऑनलाईन प्रशिक्षणार्थी अर्जाच्या संलग्नकाची (Attachment) उदा. फोटो, मार्कशीट, इतर कागदपत्रे याचा जास्तीत जास्त फाइल आकार 1 एमबी पेक्षा जास्त नसावा.
५. उमेदवाराने त्यांची मूळ स्कॅन केलेली कागदपत्रे स्पष्ट दिसणेकरिता कागदपत्रे ४५० डीपीआय रिझोल्यूशनसह अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड केलेली कागदपत्रे सुस्पष्ट दिसत असल्याबाबतची खात्री स्वतः उमेदवाराने करावी. कागदपत्रे स्पष्ट न दिसल्याने किंवा चुकीची माहिती भरलेली असल्यास अर्ज बाद झाल्यास त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहतील.
६. उमेदवाराने शिकाऊ उमेदवारिकरिता निवड यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या कुठलाही राजकीय/ अराजकीय किवा अन्य कुठल्याही मार्गाने किवा अन्य माध्यमातून प्रशासनावर दबाव आणल्यास संबंधीत अर्जकर्त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
७. अर्जदार हा/ही बाधित गावाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याच्याजवळ आधारकार्ड व वय अधिवास दाखला (डोमिसाईल) असणे गरजेचे आहे, तसे
नसल्यास सदर अर्ज अवैध ठरवण्यात येईल.
८. दि.०१/०९/२०२६ रोजी अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ४३ वर्ष पेक्षा कमी असावे
विशेष सूचना :-
१) उमेदवारास फक्त एकदाच अर्ज सादर करण्याची मुभा असेल. १ पेक्षा अधिक अर्ज केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
२) भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण भरलेला अर्ज सांभाळून ठेवावा. कागदपत्रे पडताळणीवेळी ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज उमेदवाराकडे उपलब्ध नसल्यास, अपुर्ण कागदपत्रांच्या आधारे अर्जदारास अपात्र करण्यात येईल. अर्जदाराने दिलेली कुठल्याही प्रकारची कारणे अथवा आणलेला राजकीय/संघटनात्मक दबाव ग्राह्य न धरता पुढील प्रक्रियेस अपात्र ठरविण्यात येईल.
३) संपुर्ण भरती प्रक्रियेदरम्यान बदल करण्याचे सर्व अधिकार मा.मुख्य अभियंता, भुसावळ औ.वि.केंद्र,दीपनगर राखुन ठेवीत आहेत.
*वरील सर्व सुचना मी वाचले असुन मला
मान्य आहे. (I have read all above instructions and am ready to abide it.